शहापूर पोलीसठाण्या शेजारी मोकळ्या मैदानात रात्री मद्यपींचा वावर; पोलिसांचे दुर्लक्ष
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर सामान्य नागरिकांचे मत

बेलगाम प्राईड/ बेळगाव शहापूर पोलीस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात सायंकाळी साडेसात नंतर मद्यपानासाठी अनेक समूह जमत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मैदानात अंधाराचा फायदा घेत खुलेआम मद्यपान आणि संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दृश्य पुराव्यांमधून दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, हे मैदान मुख्य रस्त्यालगत असून या मार्गावरून दररोज स्थानिक नागरिक, महिला, कुटुंबीय या भागातून नागरिक ये-जा करतात. तसेच, याच्या शेजारीच पोलीस स्थानक आहे. याच मार्गावरून पोलिसांची गस्त वाहनेही नियमितपणे जातात. असे असतानाही या प्रकारावर प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलीस ठाण्याच्या अगदी शेजारीच अशा प्रकारे सायंकाळपासून मद्यपानासाठी गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील रहिवासी आणि रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पोलीस ठाण्याच्या शेजारीच हा प्रकार सुरू असल्याने संबंधित यंत्रणेला याची माहिती आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई का झालेली नाही, की इथे बसणाऱ्या युवकांकडून शेजारच्या पोलिसांना किस्से गरम केले जातात असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

तर याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस आयुक्तांनी याकडे सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मद्यपान करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण राखण्यासाठी संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.




