बेळगाव बसस्थानकावर चोरीच्या तयारीत असलेला तरुण अटकेत, मार्केट पोलीसांची कारवाई

बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चोरीच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला *मार्केट पोलीसांनी अटक केली आहे.आरोपी बसस्थानकाच्या कंपाऊंड भिंतीजवळ लपून बसला होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे – प्रदीपकुमार श्रीराम चन्ने, (वय ३२) मूळ गाव – मूलाल हुलकापूर, कनोज, उत्तर प्रदेश,सध्या तो बेळगावातील लक्ष्मी गल्ली, गांधी नगर येथे राहत होता.काल शनिवारी रात्री ८.२५ वाजता बेळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानकाच्या कंपाऊंड भिंतीजवळ हा आरोपी संशयास्पदरीत्या लपून बसला होता.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोटारसायकल चोरण्याच्या उद्देशाने तसेच सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो तिथे लपून आपली ओळख लपवत होता. यावेळी गस्तीवर असलेल्या मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.त्याच्याविरुद्ध कलम ९६ कर्नाटक पोलीस कायदा यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.




