Uncategorized
Trending

अपघात होताच कार ने पेट घेतला लोकायुक्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

बेलगाम प्राईड / कार गाडीचा दुभाजकाला ठोकल्याने अपघात होऊन भीषण आग लागली या दुर्घटनेत पोलीस निरीक्षकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी धारवाड येथे घडली. 

त्यामध्ये लोकायुक्त पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा मृत्यू झाला ते प्रवास करत असलेल्या कार आय -20 गाडीने दुभाजकाला धडक देताच अचानक पेट घेतला आणि पेटत्या कारमधून सालीमठ यांना बाहेर पडता न आल्यामुळे यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूर जवळील गदग -हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील अरेरा पुलाजवळ काल शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ही दुर्घटना घडली. गदग येथून हुबळीच्या दिशेने येत असताना नियंत्रण सुटलेल्या कार गाडीने रस्त्यावरील दुभाजकाला धडक देताच क्षणार्धात पेट घेतला.

त्यानंतर आगीने झपाट्याने कारला आपल्या विळख्यात घेतल्यामुळे ती संपूर्णपणे भस्मसात झाली. अपघात घडला त्यावेळी हावेरी येथे लोकायुक्त पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे पंचाक्षरी सालीमठ हे स्वतः कार चालवत होते, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. गदग येथील आपल्या कुटुंबीयांची भेट घेऊन परतत असताना दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला.

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दल आग विझवेपर्यंत कारगाडी संपूर्ण जळून खाक झाली होती. तसेच कार मधील मृतदेह होरपळून कोळसा झाल्यामुळे ओळखणे कठीण झाले होते. यांच्या कुटुंबीयांनी मयताच्या हातातील ब्रेसलेट वरून मृतदेहाची ओळख पटू शकली. अपघात स्थळी धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी भेट देऊन पाहणी केली. आणि घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंद करून घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!