Uncategorized
Trending

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन.

बेलगाम प्राईड/ सिमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन इतिहास आत्मसात करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यंदा देखील भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यंदाचे हे पाचवे वर्ष असून सिमाभागात आयोजित होणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेत बेळगाव शहर, ग्रामीण, खानापूर तालुका आणि निपाणी भागातून विद्यार्थी सहभागी होतात. ही स्पर्धा मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी गोवावेस जवळील मराठा मंदिर कार्यालय आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन खानापूर रोड बेळगाव येथे दोन सत्रात संपन्न होणार आहे. स्पर्धा सिमाभाग मर्यादित असून चार गटात स्पर्धा आयोजित केली आहे.

) प्राथमिक विभाग (लहान गट) इयत्ता ४ थी पर्यंत,

२) प्राथमिक विभाग (मोठा गट) इयत्ता ५ वी ते ७ वी

३) माध्यमिक विभाग ८ वी ते १० वी पर्यंत

४) महाविद्यालयीन विभाग (सिमाभाग व्यतिरिक्त आंतरराज्यीय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात) इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर (वय २८ पर्यंत) सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, शिवकालीन इतिहास, शालेय अभ्यासक्रम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सिमाप्रश्न या संदर्भ पुस्तिकेवर आधारित विषयावर स्पर्धा असेल.

विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पदक, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी झाल्या बद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख ०४/०१/२०२६ असून स्पर्धकांनी नावनोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे स्पर्धा प्रमुख

प्रतीक पाटील 7338145673

सिद्धार्थ चौगुले 7338097882

आशिष कोचेरी 9886103373

साईनाथ शिरोडकर 7411872442

यांच्याशी तसेच अधिक माहितीसाठी अध्यक्ष अंकुश केसरकर आणि सरचिटणीस श्रीकांत कदम, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी बेळगाव यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!