Uncategorized
Trending

बेळगाव जिल्हा कराटे संघाला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ‘ओव्हरऑल जनरल चॅम्पियनशिप

बेलगाम प्राईड/ दि.11 जानेवारी 2026 रोजी नेहरू इनडोअर स्टेडियम, शिमोगा येथे सह्याद्री शिवमोगा कराटे असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय खुल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेने उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेला ‘ओव्हरऑल जनरल चॅम्पियनशिप’चा मान देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेत सुमारे 800 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातून 70 कराटेपटूंनी सहभाग घेतला होता त्यांनी काता व कुमिटे प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी मान्यवर व आयोजकांच्या हस्ते बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष  गजेंद्र काकतीकर व सचिव जितेंद्र काकतीकर यांना चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सर्व यशस्वी कराटेपटूंना प्रशिक्षक परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, निलेश गुरखा, नताशा खानापूरकर व अक्षय परमोजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!