Uncategorized
Trending

चलनबंदीतील ४०० कोटींच्या नोटाची लूट: बेळगाव पोलिस तपासात सहभागी

बेलगाम प्राईड / चलनबंदीतील नोटा गोव्यातून कर्नाटक मार्गे महाराष्ट्रात दोन ट्रक मधून जातेवेळी चोर्ला घाटात सुमारे ४०० कोटींची लूट झाल्याची घटना घडली. या घटनेची तक्रार नाशिक येथील घोटी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात आता बेळगाव पोलिसांनी अधिकृत सहभाग नोंदवला आहे.

बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी शुक्रवारी महाराष्ट्र पोलिसांकडून सहकार्याची औपचारिक मागणी प्राप्त झाल्याची माहिती दिली. तपास यंत्रणेनुसार, कर्नाटक–गोवा सीमेवरून महाराष्ट्राकडे जात असताना चलनबंदीतील नोटांनी भरलेले कंटेनर असलेले दोन ट्रक चोर्ला घाटात लुटले गेले ही घटना कर्नाटकात घडली. असली तरी गुन्हा नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

आतापर्यंत या प्रकरणात नाशिक पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र, ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक किशोर सावला हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

संदीप दत्तात्रय पाटील यांच्या तक्रारीवरून प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला असून, त्यांनी आपल्या आरोपांना पुष्टी देणारे डिजिटल पुरावे सादर केले आहेत. चोरी उघडकीस आल्यानंतर आपले अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात एका प्रभावशाली बिल्डरशी संबंधित व्यक्ती, काही नाशिक पोलीस कर्मचारी, हवाला ऑपरेटरचे सहकारी आणि इतर काही जणांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

तसेच संबंधित बिल्डर आणि त्याच्याशी जोडलेल्या एका राजकारण्याच्या सूचनेवरून काही पोलिस अधिकाऱ्यांनी चलनबंदीतील नोटांच्या हालचालींवर नजर ठेवली असा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे.

तपासाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या चलनबंदीतील नोटा महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाशी संबंधित होते आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्याचा उद्देश होता. या नोटांचे लहान व वैध चलनात रूपांतर करण्याची जबाबदारी एका आश्रमाकडे सोपवण्यात आली होती आणि नंतर ही रक्कम पुन्हा महाराष्ट्रात पाठवली जाणार होती.

आरोपांनुसार, ६०:४० कमिशनच्या आधारे त्या आश्रमाने ₹१७० कोटींची वैध रक्कम देण्याचा करार होता. ही रूपांतरित रक्कम निवडणूक प्रचार व निवडणुकीनंतरच्या राजकीय हालचालींसाठी वापरण्यात येणार होती. या प्रकरणाचे गांभीर्य आणि त्याचे राजकीय परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

बेळगाव पोलिसांच्या सहभागाची पुष्टी करताना पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, तपास पुढे जात असताना बेळगाव पोलीस महाराष्ट्र पोलिसांना पूर्ण सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!