Uncategorized
Trending

बेळगाव क्लब महिलांच्या वतीने फॅशन शो स्पर्धा : अमृता व जया या विजयत्या ठरल्या 

बेलगाम प्राईड/ बेळगाव क्लब महिला संघटनेच्या वतीने क्लबच्या आवारात फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.क्लब महिला संघटनेच्या अध्यक्षा अमी दोशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

अशा स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना सक्रिय करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हार-जीतपेक्षा सहभाग महत्त्वाचा असून मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतल्यामुळे आम्हाला आणखी कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली, असे अमी दोशी यांनी सांगितले.

५९ वर्षांखालील आणि ६० वर्षांवरील महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ३० महिलांनी सहभाग घेतला. ५९ वर्षांखालील गटात १८ स्पर्धक सहभागी झाले असून अमृता सी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ६० वर्षांवरील गटात १२ स्पर्धक सहभागी झाले होते. या गटात जया जोशी विजेत्या ठरल्या.आरती भाटिया व सोनिया खुराना यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाला २०० हून अधिक महिलांनी उपस्थिती लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!