
बेलगाम प्राईड /कोणत्याही कागदपत्रांविना महाराष्ट्रातून कर्नाटकात इंधन वाहतूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीला करण्यात आल्याची कारवाई माळमारुती पोलिसांनी केली या कारवाईत त्यांच्याकडून ३ लाखांचे इंधन व १२ लाखांचा टैंकर जप्त केला आहे.
या घटनेत अटक केलेल्या संशयितांमध्ये दिनेशकुमार भगीरथ रामजी, सुखदेव जयमराम (दोघेही रा. राजस्थान), इस्तियाक शेख, कुंदन म्हात्रे, प्रवीण आवटी तिघेही रा. मुंबई), समीर परांगे (रा. रायगड) व अरिहंत (रा. तुमकूर) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून डिझेल नेऊन ते तुमकूर येथील अरिहंत याला विक्री करण्यात येणार होते.
याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ऑटोनगर येथे सापळा रचला. यावेळी टाटा पॉवर प्लांट येथे दुहेरी रस्त्यावरून कणबर्गीकडे जाणारा टँकर (जीजे-१२ बीटी-७०८९) याला संशयितरित्या थांबून त्याची तपासणी केली असता यामध्ये डिझेल असल्याचे आढळून आले. याची कागदपत्रे मागितली असता संबंधितांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे चौकशीत आढळून आले.
त्यामुळे पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्ढेकर, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी यांनी कारवाई केली. कारवाईत उपनिरीक्षक उदय पाटील, पी. एम. मोहिते यांच्यासह एम. जी. कुरेर, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, श्रीमती आर. जी जन्नेजी, गोपाळ लट्टी, सिद्धनाथ मराठे, दिपक बिचगत्ती, द्यामण्णा मुरगोड, मंजुनाथ माळेद, बसवराज कुळ्ळ्ळोळी यांनी भाग घेतला.




