बेलगाम प्राईड/ महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने 200 ते 225 कार्यकर्ते दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, किल्ले रायगड येथे जाण्यापूर्वी रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला व क्रांती भूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
महाड शहराच्या मध्यभागी असलेले चवदार तळ्याला ऐहासिक व सामाजिक महत्व असून या तळ्यामधील पाणी अस्पृश्याना वापरण्यास बंदी होती, त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करून या तळ्यातील पाण्याचा वापर समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले व 20 मार्च 1927 ला या तळ्यातील पाण्याचा वापर सर्वांसाठी खुला झाला.
याच चवदार तळ्याला आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले. या स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र साळवे यांनी समिती कार्यकर्त्यांची सर्वांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव सांगितला व सीमाप्रश्नी आपण सदैव सीमावासीयांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली. या बाबासाहेबांच्या स्मारकाचे प्रशांत जाधव,दीपक घाडगे,प्रदीप सकपाळ हे पदाधिकारी उपस्थित होते.
तर अध्यक्ष शुभम शेळके यांनी ज्या बाबसाहेबांनी या देशाची घटना लिहिली व त्यांच्याच संविधानावर या देशाची लोकशाही चालते, याच संविधानावर विश्वास ठेवून आम्ही सीमावाशीय गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढत आहोत, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सीमाप्रश्नी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.
या वेळी कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेबांचा विजय असो,बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर,महादेव पाटील,शिवाजी हवळाणाचे,मोतेश बारदेशकर,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर,अशोक घगवे, श्रीकांत नांदूरकर,सुरज जाधव,सचिन दळवी,ऍड.वैभव कुट्रे,मांणगावचे रायगड जिल्हा प्रतिनिधी,पत्रकार नरेश पाटील,रमेश माळवी, भूपाल पाटील, महेंद्र जाधव,सुशांत देसाई,निखिल देसाई, प्रकाश हेब्बाजी,आदी उपस्थित होते.




