Uncategorized
Trending

देसूर गावच्या जोतिबा पाटील यांना ‘ऑनरी लेफ्टनंट’ पदी पदोन्नती

बेलगाम प्राईड/ गावचे कर्तबगार सुपुत्र जोतिबा गणपती पाटील यांना भारतीय सैन्य दलात ‘ऑनरी लेफ्टनंट’ ही मानाची पदोन्नती मिळाली असून या पद्धतीने त्यांनी देसूर गावाचे नांव उंचावले आहे.

भारतीय सैन्यातील जोतिबा पाटील यांच्या प्रदीर्घ अशा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक सेवेची दखल घेऊन त्यांना हा पदोन्नतीचा सन्मान बहाल करण्यात आला आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना सैन्यातील एका जवानाला मिळणारा हा महत्त्वाच्या सन्मानां पैकी एक मानला जातो. या पदोन्नतीमुळे त्यांना आता भारतीय सैन्यात ‘कमिशन्ड ऑफिसर’चा दर्जा प्राप्त झाला आहे. सदर यशाबद्दल देसूर परिसरातून जोतिबा पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कुटुंबातून येऊन, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश गावातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!