बेळगाव हर्क्युलस किताबाचा मानकरी मंजुनाथ एस. तर व्यंकटेश ताशिलदार ‘बेळगाव श्री’ चा मानकरी ठरला

बेलगाम प्राईड/ बेळगाव श्री किताब पटकाविलेल्या व्यंकटेश ताशिलदार व उत्कृष्ट पोझर ओम पाटील यांना बक्षिस देताना मान्यवर.क्रीडा प्रतिनिधी बेळगाव
मराठा युवक संघ व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित ६० व्या बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पॉलीहेड्रॉनच्या व्यंकटेश ताशिलदारने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर बेळगाव श्री हा मानाचा किताब पटकाविला. तर किल्लेकर जिमचा ओम पाटील हा उत्कृष्ट पोझर ठरला.
मराठा मंदिर मंगलकार्यालय येथे आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे कर्नल हितेंद्र मराठे, काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी, मिहीर पोतदार, चौगुले, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, रघुनाव बांडगी, किरण कावळे, नेताजी जाधव, सुहास किल्लेकर, अजित सिद्दण्णवर, मोहन चौगुले, सुनील आपटेकर, गंगाधर एम, हेमंत हावळ, राजाराम मजुकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन
व हनुमान मूर्तींचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार ५५, ६० ६५, ७०,७५, ८० व ८० किलो वरील अशा सात वजनी गटात घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
५५ किलो १) शुमम चौगुले-फीट प्रो २) विनायक -पेंटॉट फ्लॅ क्स ३) राजू मुचंडीकर गोल्ड लाईफ ४) श्रीशीव मोदगेकर-वज ५) केतन मातकांडे-युनिव्हर्सल,६० किलो- १) उमेश गंगणे फ्लैक्स मल्टी, २) सुरज भंडारी गोल्ड जीम, ३) साईनाथ नार्वेकर फ्लॅक्स, ४) सागर कळळीमनी- हर्षा, ५) सोहम कांबळे लाईफ टाईम.६५ किलो- १) महेश पाटील टीम प्रसाद, २) नागेश चोर्लेकर फ्लॅक्स, ३) अफताफ किल्लेदार गोल्ड लाईफ, ४) श्रीधर हंडे बालहनुमान, ५) अविनाश परीट सिद्धनाथ हेल्य. ७० किलो १) सुनील भातकांडे पॉलीहैड्रॉन, २) किशोर पुजारी मंथन जीम, ३) स्वप्नील कपिलेश्वरी मोरया, ४) आकाश साळुंखे रॉयल फिटनेस, ५) अथर्व यादव-चिकोडी.७५ किलो- १) व्यंकटेश ताशिलदार पॉलीहैड्रॉन, २) लखन कांबळे चिकोडी, ३) विनीत हणमशेट रॉ फिटनेस, ४) संकेत सुरुतेकर समर्थ, ५) गजराज पाटील फीट प्रो.८० किलो १) अमर गुरव फिटनेस फॉर्च, २) गजानन काकतीकर बालहनुमान, ३)
मराठा युवक संघाचे शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन करताना मान्यवर
मारुती ए. के डायमंड जीम, ४) योगेश पाटील हार्डकोरी, ५) विनोद पाटील फ्लॅक्स जीम.८० किलोवरील गट- १) व्ही. बी. किरण आयकॉनिक, २) एम. डी. साकीब सेवंथ स्टार, ३) दिग्विजय पाटील फ्लॅक्स, ४) हर्षद पाटील रॉ फिटनेस, ५) शुमम पुजारी-स्ट्रेट स्टुडियो.
बेळगाव श्री किताबासाठी शुभम चौगुले, उमेश गंगणे, महेश पाटील, सुनील भातकांडे, व्यंकटेश ताशिलदार, अमर गुरव, व्ही. बी. किरण यांच्यात लढत झाली. त्यामधून व्ही. बी. किरण व व्यंकटेश ताशिलदार यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये पॉलीहेड्रॉ नच्या व्यंकटेश ताशिलदारने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर ‘बेळगाव श्री’ हा मानाचा किताब मिळविला. तर बेस्ट पोझरचा किताब किल्लेकर जिमच्या ओम विजय पाटीलने पटकाविला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक, मानाचा
किताब, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर गंगाधर एम., राजाराम मजुकर, प्रकाश पुजारी, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, आकाश हुलीयार, सुनील आपटेकर, सुनील पवार, नूर मुल्ला, काटेश गोकावी, बसवराज अरळीमठी, प्रशांत सुगंधी तर स्टेज मार्शल म्हणून कृष्णा चिक्कतुंबल, सुनील राऊत, गजानन हगिरगेकर यांनी काम पाहिले.




