Uncategorized
Trending

गोकाक-सौंदत्ती तालुक्यातील मंदिरे फोडून दागिने लुणाऱ्या चौकडीला अटक

आरोपींकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त चार मंदिरे फोडल्याची कबुली

बेलगाम प्राईड / जिल्हयातील मंदिरांना लक्ष्य बनविणाऱ्या एका चौकडीला कुलगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून ८ लाख ८४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोकाक व सौंदत्ती तालुक्यातील चार मंदिरे फोडल्याची कबुली या चौकडीने दिली आहे.

बिराप्पा हणमंतप्पा कत्ती (वय ३६), बसवराज भीमाप्पा तळवार (वय ३५) दोघेही राहणार इटनाळ, ता. यरगट्टी, भरमाप्पा संगाप्पा लगळी (वय ३९) राहणार होनकुप्पी, ता. मुडलगी, विलास लक्ष्मण रसाळ (वय ३४) रा. देऊळघाट, ता. जि. बुलढाणा अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत या चौकडीने मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात २,सौंदत्ती व कुलगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी १ मंदिरे फोडल्याची चोरट्याने कबुली दिली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगोडचे पोलीस उपनिरीक्षक बी.आनंद, आर. एस. पुजारी, एस. बी. पाटील, के. सी. बागली, एस. एन. बडबडे, एम. एस. कुरेन्नावर, एस.बिराप्पा कट्टी विलास रसाळ भरमाप्पा लगळी बसवराज तळवार एफ.मळली व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर आदींनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

मंदिरांवर घाला घालणाऱ्या चौकडीला अटक अवरादी, ता. मुडलगी येथील मदनुराम्मा व श्री शेट्टम्मादेवी मंदिरांचे दरवाजे फोडून देवीच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते.यासंबंधी २१ जानेवारी २०२६ रोजी श्रीशैल गंगाप्पा पुजेरी (वय ४५) राहणार अवरादी यांनी कुलगोड पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना चौकडीला अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता चार मंदिरे फोडल्याची कबुली त्यांनी दिली.

अवरादी येथील मंदिरातून चोरलेले १० ग्रॅम सोन्याचे दागिने, मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन मंदिरांतून चोरलेले १ लाख २९ हजार व ९५ हजार ९०० रुपये किमतीचे दागिने व सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका मंदिरातून चोरलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ३ लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली व दीड लाख रुपये किमतीची चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण ८ लाख ८४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!