Uncategorized
Trending

अल्पवयीन मुलीवर बलात्कार त्या नराधमाला ३० वर्षे सक्तमजुरी

बेलगाम प्राईड / बेळगाव जिल्ह्यातील नेसरगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जिल्हा पोक्सो न्यायालयाने ३० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण मारुती कुरगुंद (वय २४) रा. देशनूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे न्यायालयाने त्याला १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

नेसरगी पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर २०२३ रोजी त्या चार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी लक्ष्मण याने पीडित मुलगी अल्पवयीन आहे. हे माहित असतानाही, तिला दुचाकीवरून गोव्याला फिरवण्याच्या बहाण्याने नेले होते.

तिथून परतताना खानापूर मार्गे मिरज येथे नेऊन लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीएसआय वाय. एल. शिगीहळ्ळी यांनी गुन्हा नोंदवून घेतला होता. तर सीपीआय राघवेंद्र बी. हवालदार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्याची सुनावणी बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष जलदगती पोक्सो न्यायालय-१ मध्ये पार पडली. न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी १० साक्षीदार, ७१ कागदोपत्री पुरावे आणि १६ जप्त वस्तूंच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले.

पोक्सो कायद्याच्या कलम ४ नुसार आरोपीला ३० वर्षांचा कडक कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाच्या शिक्षेचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही दिले आहेत. या खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी मांडलेला प्रभावी युक्तीवाद आणि पुराव्यांमुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यात यश मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!