
बेलगाम प्राईड/ के.के. कोप्प गावाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मटका जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या एका मटका बुकीला हिरेबागेवाडी पोलिसांनी काल शुक्रवारी अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव वीरप्पा नागप्पा मडगली (वय 46) रा. नावलगट्टी ता. बैलहोंगल असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.आरोपी वीरप्पा हा के.के. कोप्प गावाच्या हद्दीत नागेरहाळकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी काल कल्याण मटका असे या ठिकाणी लोकांचे पैसे लावून घेत होता.
त्यावेळी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून वीरप्पा याला रंगेहाथ अटक केली. तसेच त्याच्या जवळील रोख 750 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात पुन्हा नोंद झाला आहे.




