Uncategorized
Trending

बीएसएफ येथे बेस्ट परेड कमांडरचा रोशनीला पुरस्कार  बेळगावात गौरव पूर्ण सन्मान

बेलगाम प्राईड/ पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे 31 जानेवारी रोजी झालेल्या बी.एस.एफ. (BSF) शपथग्रहण समारंभात खानापूर तालुक्यातील ओलमनी येथील मूळ रहिवासी व सध्या शाहूनगर, कंग्राळी बी.के. येथे वास्तव्यास असलेली कु.रोशनी वसंत मुळीक हिने उल्लेखनीय यश संपादन केले. या समारंभात तब्बल 400 मुला-मुलींमध्ये तिला परेड कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा मान मिळाला.

याशिवाय रोशनीला बेस्ट परेड कमांडर व बेस्ट ड्रिल हे मानाचे पुरस्कारही प्रदान करण्यात आले. 400 प्रशिक्षणार्थीमध्ये तिने नारीशक्तीचा प्रभावी ठसा उमटवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या यशाच्या औचित्याने मुळीक कुटुंबीयांतर्फे वसुंधरा मंगल कार्यालय, शाहूनगर येथे रोशनीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, बी.के.कंग्राळी  ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, जोतिबा शहापुरकर, बाबू पावशे, तसेच रोशनीचे प्रशिक्षक प्रशांत शहापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रोशनीचे वडील वसंत मुळीक, आई वैष्णवी मुळीक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोशनीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नातेवाईक, पाहुणे तसेच परिसरातील अनेक महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!