Uncategorized

बेळगावमध्ये जेडीएसचा २२ फेब्रुवारी रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्यात जनता दल (एस) पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी येत्या २२ फेब्रुवारी रोजी भव्य कार्यकर्ता मेळावा व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी आमदार वीरभद्रप्पा हालहरवी यांनी दिली.

शुक्रवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वीरभद्रप्पा हालहरवी बोलत होते. ही बाईक रॅली सीपीएड मैदानापासून सुरू होऊन राणी चन्नम्मा चौकामार्गे गांधी भवन येथे विसर्जन केली जाणार आहे. जिथे रॅलीचा समारोप एका मोठ्या सभेत होईल. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष निखिल कुमारस्वामी मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी करणे हा या मेळाव्याचा मुख्य हेतू आहे. जिल्ह्यात जेडीएसचे सक्षम उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असल्याचे वीरभद्रप्पा हालहरवी यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला सिद्धनगौडा पाटील यांच्यासह पक्षाचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!