
बेलगाम प्राईड/ गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे येथील काही युवकांनी पुढाकार घेत बसस्टॉप शेडची उभारणी केली आहे. उन्हाळा व पावसाळ्यात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमातून युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
याचबरोबर आपल्या गावचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान, जटगे येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे प्रवेशद्वार स्पष्ट दिसावे आणि ये-जा करणाऱ्यांना रस्ता सुस्पष्टपणे जाणवावा, या उद्देशाने युवकांनी स्वतःचा खर्च करून “श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान, जटगे” नावाची कमान उभारली.

हा उपक्रम केवळ कामापुरते मर्यादित नसून गावाविषयीची आपुलकी, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव यांचे प्रतीक आहे. या कार्याबद्दल गावकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून संबंधित युवकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या कार्यासाठी मारुती महाबळेश्वर तिनेकर, अंकुश बळीराम मळीक, ज्योतिबा विठ्ठल मळीक, युवराज छत्रुघन मळीक, संतोष नारायण पाटील, सागर वामन पाटील, म्हात्रू मल्लू पाटील, पुंडलिक परशराम तिनेकर, मारुती शिवाजी तिनेकर, मिथुन मलू पाटील, सागर चंद्रकांत पाटील, पवन पाटील आदीनी योगदान दिले.




