
बेलगाम प्राईड/ पांगूळ गल्ली येथील अश्वत्थामा युवक मंडळाच्यावतीने २ व ३ मार्च रोजी होळी व रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
सोमवार दि.२ रोजी रात्री १० वा. होळी आणण्याचा व पळविण्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. ३ रोजी पहाटे ५.३० वा. होळी व होळी दहन करण्यात येईल. चंद्रग्रहण असल्यामुळे लोटांगण कार्यक्रम सायंकाळी ५ वा. गणपती मंदिर येथून करण्यात येणार आहे. देवालयाची पूजा ग्रहण सुटल्यानंतर करण्यात येणार असून त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात येईल भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभघ्यावा, असे आवाहन पांगुळ गल्ली येथील पंच कमिटी व कार्यकारी मंडळाने केले आहे.




