Uncategorized
Trending

अपघात ग्रस्त चालकाला माणुसकीचा स्पर्श: पोलीस आयुक्तांची बोरसे 

बेलगाम प्राईड/ धोकादायक स्पीड ब्रेकर मुळे झालेला महिलेचा मृत्यू आणि माध्यमातून होत असलेली पोलीस प्रशासनावरील टीका याची दखल घेत बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गतिरोधक वर चुन्याचे पट्टे मारण्यासाठी तातडीने दखल घेतली मात्र हे काम सुरू असताना रस्ते अपघातात किरकोळ जखमी झालेल्या युवकाला उपचार करण्याचा माणुसकी पण नाही दाखविले आहे.

काँग्रेस रोडवर स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे ओढण्याचे काम सुरू असताना अचानक वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्याच दरम्यान एक किरकोळ अपघात घडला. एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक जखमी झाला. त्या ठिकाणी हजर असलेले शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना त्वरित मदतीचे आदेश दिले.

पोलीस व्हॅनमधील फर्स्टटेड औषधाचा बॉक्स आणण्यात आला आणि जखमी युवकावर त्वरित प्रथमोपचार करण्यात आले. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून उपचाराची खात्री केली. त्यानंतर युवकाला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले.

काँग्रेस रोडवरील गतिरोधक वरील अपघात टाळण्यासाठीच पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू होते. मात्र कामादरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने हा किरकोळ अपघात घडला. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले.

या प्रसंगी पोलीस आयुक्त आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. प्रशासन फक्त कायदा-सुव्यवस्था राखत नाही. तर गरज पडल्यास नागरिकांच्या मदतीला धावून जाते याचे प्रत्यक्षरीत्या उदाहरण या घटनेतून दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!