
शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी
बेलगाम प्राईड / छत्रपती शिवाजी उद्यान येथे आज सकाळी ६ वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे विधीपूर्वक पूजनाचा कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पासून संपूर्ण शहर शिवमय झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवर आणि “जय जिजाऊ, जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून लागले.
महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक भाजप नेते डॉ. रवी पाटील तसेच अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर सामूहिक आरती करण्यात आली यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गड किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यात आल्या पवित्र शिवज्योत शहरात दाखल होताच मावळ्यांच्या आगमनाने वातावरणात अधिकच उत्साह निर्माण झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवभक्त उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त सादर होणारे चित्ररथ व सजीव देखावे यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून, हे देखावे भव्य-दिव्य स्वरूपात सादर होणार आहेत. मिरवणूक शांततेत व शिस्तीत पार पाडावी, असे आवाहन सुनील जाधव यांनी केले.




