
बेलगाम प्राईड /मुतगा ता.बेळगाव येथील प्राध्यापक अभिजीत पाटील हे महाराष्ट्रर मध्येे झालेल्या एम- सेट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. अभिजीत यांनी वाणिज्यशास्त्र विषयात एम.कॉम.ही पदवी मिळविलेली असून ,वाणिज्यशास्त्र या विषयातच सेट परीक्षा चांगले गुण मिळवून ते यशस्वी झाले आहेत. याशिवाय त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम.ए.ही पदवी मिळवलेली आहे.
या त्यांच्या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, यापूर्वी ते के-सेट परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या गोगटे पदवी पूर्व महाविद्यालयात वाणिज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या यशासाठी त्यांना त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर ए.एस.केरूर आणि के.एल.एस.मॅनेजमेंट यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून परिसरात त्याचे कौतुक केले जात आहे.




