
बेलगाम प्राईड/ बेळगाव ग्रामीणचे ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम यांची काडा अध्यक्षपदी निवड राज्य सरकारने बजावली आहे.
युवराज कदम यांनी याआधी बुडा अध्यक्ष पदाचा देखील कार्यभार सांभाळला होता ते बेळगाव उचगाव भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी बेळगाव एपीएमसीचे देखील अध्यक्षपद बजावले होते त्यामुळे बेळगावच्या राजकारणाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे.
युवराज कदम यांना काडा अर्थात मलप्रभा घटप्रभा निगम महामंडळाचे अध्यक्ष पद देत काँग्रेसने मराठा समाजला ग्रामीण भागात एक नेतृत्व देऊ केले आहे.




