सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे मोठ्या थाटात आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन

बेलगाम प्राईड/ बेळगांव मधील प्रसिद्ध व नामवंत शाळा बिर्ला इंटरनॅशनल स्कूल व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून पूर्व विभागीय, पश्चिम विभागीय, उत्तर विभागीय, दक्षिण विभागीय व सेंटर विभागीय अश्या 28 राज्यातून,8 केंद्रशासित प्रदेश व 7 देशातून गल्फ विभागातील दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, यू ए इ, बहरीन, शारजा, येमेन आणि कुवेत येथून सुमारे 1200 च्या वर टॉप स्केटिंग स्पर्धक उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धा दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर 2026 या दरम्यान शिवगंगा स्पोर्ट्स क्लब आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकवर होणार आहे तर रोड वरील स्पर्धा बी एस एन एल ऑफिस समोरील रोडवर होणार आहे आज या स्पर्धेचे उद्घघाटन बेळगांव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन मोठ्या थाटात झाले.
यावेळी बिर्ला इंटरनॅशनल स्कूल च्या प्रिन्सिपल स्पूर्ती, यांनी आमदार अभय पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला व सर्व स्केटर्स ना मार्गदर्शन केले यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे मुख्याध्यापक डॉ प्रेमानंद जाधव, बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो अध्यक्ष उमेश कलघटगी, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्षा ज्योती चिंडक,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर देश विदेशातून आलेले स्केटर्स पालक,बिर्ला इंटरनॅशनल चे शिक्षक व त्यांचे स्टाफ आणि ईतर अनेकजण या उद्घघाटन समारंभाला उपस्थित होते.




