Uncategorized
Trending

बागलकोट येथे ईसीएचएस पॉलिक्लिनिकचे उद्घाटन; माजी सैनिकांसाठी आरोग्यसेवेचा नवा टप्पा

बेलगाम प्राईड/ बागलकोट येथे कर्नाटक व केरळ सब एरियाच्या वतीने बागलकोट येथे नव्या माजी सैनिक योगदानाधारित आरोग्य योजना (Ex-Servicemen Contributory Health Scheme – ECHS) पॉलिक्लिनिकचे उद्घाटन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, स्टेशन कमांडर बेळगाव यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

या पॉलिक्लिनिकमुळे बागलकोट जिल्हा व परिसरातील सुमारे सहा हजार माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला वरिष्ठ लष्करी अधिकारी, माजी सैनिक तसेच ईसीएचएसच्या लाभार्थ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या पॉलिक्लिनिकमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा असून, अनुभवी आरोग्यतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे,

ज्यामुळे सेवा कार्यक्षमतेने देण्यात येणार आहेत. ब्रिगेडियर मुखर्जी यांनी या प्रकल्पात योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानत, राष्ट्रसेवकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देणे ही भारतीय सेनेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. बागलकोटमधील ईसीएचएस पॉलिक्लिनिकची स्थापना ही माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी भारतीय सेनेच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!