पोलीस उपनिरीक्षकांच्या निरीक्षकपदी बढतीवर बदली
बेळगावच्या रोहिणी पाटील, सुमा गोरबाळ यांचा समावेश

बेलगाम प्राईड/ बेळगाव राज्यातील २७ पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली असून यामध्ये बेळगाव व विजापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जिल्हा महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी राजेंद्र पाटील यांना बढती मिळाली असून कर्नाटक लोकायुक्त विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे.
दोडवाड, ता. बैलहोंगलच्या पोलीस उपनिरीक्षक सुमा मंजुनाथ गोरबाळ यांची बढतीवर डीसीआरईच्या पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर मूळचे बेळगाव जिल्हयातील व सध्या
पोलीस निरीक्षक रोहिणी पाटील सिंदगी पोलीस स्थानकात कार्यरत असलेले आरिफ एम. मुशापुरी यांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली असून अंतर्गत सुरक्षा विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे.
रोहिणी पाटील या एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून परिचित आहेत. पोलीस वनविभागाच्या उपनिरीक्षकपदावर कार्यरत असताना वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्यासाठी त्यांनी कामगिरी केली आहे.आता बढतीवर लोकायुक्त बेंगळुर विभागात त्यांची बदली झाली आहे.




