Uncategorized
Trending

न्यू गुडशेठ रोड श्रीगणेश मूर्तीचा आगमन सोहाळा व प्राणप्रतिष्ठापना

बेलगाम प्राईड/ न्यू गूडस्शेड् रोड, 5 वा क्रॉस, बेळगांव येथील श्री गणेश मंदिराचे जीर्णोद्धार काम संपूर्णपणे श्रींच्या कृपाशीर्वादाने पार पडले आहे. मंदिरामध्ये नूतन श्री गणेश विग्रह प्राणप्रतिष्ठपना मूषक आणि उत्सवमूर्तिचे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

त्यानिमित्त रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक 3 वा.गणेश मूर्तीचे आगमन समस्त वाद्यवृंद सुहासिनींच्या कळसासोबत चिटुकुल्याचें हर्षोल्लासात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर बेळगांव येथून सुरू होऊन मंदिरात आगमन होणार आहे. तरी या शोभायात्रेत श्रीगणेश भक्तांनी भक्तीभावाने सहभागी व्हावेत असे कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

तसेच गुरुवार दि. 5- रोजी संध्याकाळी आणि शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी नवग्रह, वास्तुपूजा व श्रीं च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गणहोम आणि दुपारी 12 वा. महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमात परिसरातील सर्व गणेश भक्तांनी सहभागी होऊन श्रीकृपेस पात्र करावा असे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!