Uncategorized
Trending

भाजी विक्रेत्या महिलेचा प्रामाणिकपणा| पैशाची बॅग पोलिसांच्या हाती स्वाधीन

बेलगाम प्राईड/ भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. खानापूर तालुक्यातील ओलमणी गावची आणि सध्या शाहूनगर, कंग्राळी बी.के. येथे राहणारी भाजी विक्रेती महिला रस्त्यावर सापडलेली मोठी रक्कम कोणताही मोह न करता थेट पोलिसांकडे सुपूर्द केली.

दिनांक 05/02/2026 रोजी बेळगाव शहरात भाजी विक्री करत असताना या महिलेला रस्त्यावर एक पिशवी सापडली. पिशवी उघडून पाहिल्यावर त्यात मोठी रक्कम असल्याचे लक्षात आले. मात्र प्रामाणिकपणाची जाणीव ठेवत तिने ती रक्कम जवळच्या पोलिस ठाण्यात जमा केली.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित रक्कमेचा मालक शोधून काढला आणि योग्य तपासणीनंतर ती रक्कम मूळ मालकाला परत करण्यात आली.

या घटनेमुळे सदर भाजी विक्रेती महिलेच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात नैतिक मूल्यांचा आदर्श तिने घालून दिला आहे, असे प्रामाणिकपणाने राहणाऱ्या आताच्या बोटावर मोजण्याइतक्याच व्यक्ती आढळून येतात अशी प्रतिक्रिया पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!