
उचगावच्या साहिबाचा कॉमर्स विभागात 99.16% गुण प्राप्त करून यश मिळवले आहे.
बेलगाम प्राईड/ पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला असून, यंदाही बेळगावमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातील उचगाव गावची कन्या कुमारी साहिबा खाजामिया सनदी हिने कॉमर्स शाखेत 99.16 टक्के गुण मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अंगडी कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या साहिबाने 600 पैकी 595 गुण मिळवत आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ मिळवले. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही तिने यापूर्वीही उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरही तीच चमक कायम राखली.
साहिबाच्या या यशाबद्दल उचगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.




