Uncategorized
Trending

शेतकऱ्यांच्या टोल नाकाबंदीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

हत्तरगी आणि हिरेबागेवाडी टोल नाक्यांवर १३ ऑक्टोबरला आंदोलन; अवजड आणि हलक्या वाहनांसाठी वाहतुकीत बदल

बेलगाम प्राईड/ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी आणि हिरेबागेवाडी टोल नाक्यांवर शेतकरी संघटनांकडून मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी नाकाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस अधीक्षक यांनी अवजड आणि हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे.

आंदोलनाच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. साखर आणि उसाला अधिक दर मिळावा, या मागण्यांवरून शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

 

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पोलिसांनी पुढील पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

१. पहिला मार्ग : धारवाड – अलनावर – रामनगर – खानापूर – बेळगाव.                                               २. दुसरा मार्ग : धारवाड – लिंगसुगूर क्रॉस – बीदर – नंदगड – खानापूर – बेळगाव.                               ३. तिसरा मार्ग : कित्तूर – बिडी – नंदगड – खानापूर – बेळगाव.                                                  ४. चौथा मार्ग : धारवाड – कित्तूर – एम. के. हुबळी – परिसवाड – खानापूर – बेळगाव.

हलक्या मोटार वाहनांसाठीही पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

१. पहिला मार्ग : गोकाक – निपाणी – चिक्कोडी – गोकाक.                                                                २. दुसरा मार्ग : गोकाक – कमतानूर गेट – हुक्केरी – संकेश्वर – गोकाक.

येरगट्टीहून बेळगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही पोलिसांनी येरगट्टी – बागलकोट/विजापूर हा पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे.

वाहनचालकांना पोलिसांचे आवाहन

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रवासादरम्यान खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असेही पोलिसांनी सूचित केले आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत सोमवारी झालेल्या चर्चेत उसाला आणि साखरेला अधिक दर देण्याच्या मागण्यांवर सहमती न झाल्याने शेतकरी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!